जवखेड्याची सुनावणी 1 नोव्हेंबरला

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यभर गाजलेले पाथर्डी तालुक्यातील जवखेडा तिहेरी हत्याकांडाची सुनावणी प्रधान जिल्हा न्यायाधीश यांच्यासमोर सुरू आहे. या खटल्याचे कामकाज सुरू असतांना वकीलांच्या काही वैयक्तीक कारणामुळे या खटल्याचे कामकाज तहकुब करण्यात आले आहे.

त्यामुळे बुधवार दि. 1 व 2 नोव्हेंबर रोजी याची पुढील सुनावणी होणार आहे. जवखेडा येथे संजय जाधव, सुनिल जाधव व जयश्री जाधव यांची खांडोळ्या करुन हत्या करण्यात आली होती. या खटल्यात अद्याप 16 साक्षीदार तपासले असून 100 पेक्षा जास्त साक्षीदार तपासणे बाकी आहे. त्यामुळे जवखेडा प्रकरण अणखी बरेच दिवस चालण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*