‘मुन्नाभाई ३’ मध्ये काम करण्याबाबत सोनम कपूरने ठेवली हि अट….

0
मुंबई – ‘मुन्नाभाई’ चित्रपटाच्या मागील दोन भागांना मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. असध्या या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनम कपूर झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या चित्रपटात काम करण्यासाठी सोनमने एक अट ठेवल्याचं पाहायला मिळत आहे.

सोनमचा ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट १ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात सोनमने केलेल्या उत्तम अभिनयामुळे तिला ‘मुन्नाभाई ३’ साठी विचारणा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र सोनमे हे वृत्त फेटाळून लावत मला चित्रपटासाठी कोणतीही ऑफर आली नाही. जर यापुढे कधी चित्रपटासाठी ऑफर आली तर एका अटीवरच मी हा चित्रपट करेन, असं सोनमने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

‘मला ‘मुन्नाभाई’च्या सीरिजमध्ये काम करायला नक्कीच आवडेल. पण यासाठी माझी एक अट आहे. जर या चित्रपटाचं नाव ‘मुन्नी बहन’ असेल तरच मी काम करेन, असं सोनमने म्हटल्याचं नमूद केलं आहे. आता सोनमच्या या अटीनं नक्की तिला काय म्हणायचे आहे, हे तर स्पष्ट झाले नाही. मात्र, चित्रपटात अभिनेत्रीच्या भूमिकेला फारसं महत्त्व नसल्यानं सोनमनं असं उत्तर दिलं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

LEAVE A REPLY

*