नगरपालिका कर्मचार्‍यांचे सामुदायिक रजा आंदोलन

0

मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलन छेडणार

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- राज्यातील नगरपालिका मुख्याधिकारी व कर्मचारी यांच्या प्रलंबीत मागण्या पुर्ण न झाल्याने आज क्रांतीदिनाचे औचित्य साधुन सामुदायिक रजा आंदोलन तसेच 21 ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्र शिर्डी नगरपंचायतच्या कर्मचार्‍यांनी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना दिले.

राज्यातील नगरपालिकांमधील मुख्याधिकारी, कर्मचारी, रोजंदारी कंत्राटी कर्मचारी तसेच अनुकंपधारक यांच्या प्रलंबीत मागण्या संदर्भात राज्यशासनाकडे संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलने केली. मात्र याकडे शासनाने पाठ फिरविल्याने प्रलंबीत मागण्या पुर्ण झाल्या नाहीत. मागील काळात राज्य शासनाने याबाबत अनेकवेळा बैठका घेतल्या. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. राज्यशासन मागण्या संदर्भात नेहमी टाळाटाळ करीत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

तसेच कंत्राटी कर्मचार्‍यांना सफाई उद्योगातील किमान वेतन सुधारीत केलेले असताना ते मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. या सर्व कारणांमुळे राज्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, कर्मचार्‍यांना त्यांच्या न्यायहक्कासाठी क्रांतीदिनाचे औचित्य साधून सामुदायिक रजा घेण्याचा निर्णय प्रसिध्दी पत्रकाद्वारे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे या पत्रकात असेही म्हटले आहे कि, वरील दोन्ही तारखेच्या आंदोलनाची अंतीम नोटीस असून आमच्या मागण्या न झाल्यास आंदोलन सुरूच राहील असा इशारा राज्यशासनाला दिला आहे. या आंदोलना दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास आम्ही जबाबदार न राहता प्रशासन व राज्य सरकार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.

आंदोलन नोटीसीवर शिर्डी नगरपंचायतीचे वरीष्ट लिपीक मुरलीधर देसले, विजय सदाफळ, रावसाहेब म्हस्के, रावसाहेब जावळे, पद्माकर शिरसाठ, भागवत शेजवळ, बाबासाहेब चौधरी, बाळासाहेब पारधी आदी कर्मचार्‍यांच्या सह्यानिशी पत्रक देण्यात आले.

LEAVE A REPLY

*