Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पालिकेच्या साठवण तलाव 4 व 5 ची आज न्यायालयात सुनावणी

Share

आशुतोष काळे यांची माहिती

कोपरगाव (प्रतिनिधी) – नगरपरिषदेला वारंवार निवेदन देऊनही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे 4 व 5 नंबर साठवण तलावाचे काम तातडीने सुरू करावे यासाठी उच्च न्यायालयात सुनील गंगुले, संदीप वर्पे, मंदार पहाडे यांच्या नावे दाखल जनहित याचिकेची आज सोमवार दि. 26 ऑगस्ट 19 सुनावणी होणार असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी दिली.

आशुतोष काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कोपरगावच्या नागरिकांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासाठी अशोकराव काळे यांनी दोन कोटी रुपयांचा निधी आणला होता. परंतु हा निधी परत गेल्यामुळे पाणी प्रश्न रेंगाळलेला आहे. यासाठी कार्यकर्त्यांसमवेत अनेक वेळा आंदोलन करून, प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार व जिल्हाधिकार्‍यांना निवेदने दिली. आमरण उपोषण व धरणे आंदोलन प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेने 4 व 5 नंबर साठवण तलावाचे काम सुरू करण्याबाबत लेखी आश्वासनही दिले होते. परंतु कोपरगाव नगरपरिषदेकडून साठवण तलावाचे काम सुरू करण्याबाबत असलेली चालढकल कोपरगावच्या नागरिकांना न परवडणारी होती. त्यामुळे तातडीने निर्णय घेऊन 4 व 5 नंबर साठवण तलावाचे काम कोपरगाव नगरपरिषदेने तातडीने सुरू करावे, यासाठी कोपरगावच्या नागरिकांसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

याचिकेत महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या जनहित याचिकेची नियमितपणे सुनावणी सुरू आहे. परंतु कोपरगाव नगर परिषद, प्रांताधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हाधिकारी व शासनाकडून 23 जुलै 2019 रोजी 4 व 5 नंबर साठवण तलावाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची माहिती सादर करण्यात आलेली नाही. किमान आज तरी सुनावणीच्या वेळी कोपरगाव नगरपरिषदेने न्यायालयात उपस्थित राहून साठवण तलाव करणार की नाही, हे स्पष्ट केले पाहिजे, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असल्याचे आशुतोष काळे यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!