डेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा

0

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) प्राप्त झालेल्या डेटानुसार, देशात ९९२.४ दशलक्ष डेबिट कार्ड्स जारी झालेली आहेत. मात्र, यातील ७० टक्के कार्ड्स ही केवळ एटीएम्समधील व्यवहारांसाठी वापरली जातात. डेबिट कार्डाचा वापर ग्राहक किती मर्यादित पद्धतीने करत आहेत हे यातून लक्षात येते.

याविषयी बोलतांना व्हिसाचे भारत व दक्षिण आशिया विभागाचे ग्रुप कंट्री मॅनेजर टीआर रामचंद्रन म्हणाले, “२०१६ मध्ये पीओएस टर्मिनल्सची संख्या २ लाख होती. ती आता ३४ लाख झाली आहे. आपल्या देशातील पेमेंट संरचनेत (इन्फ्रास्ट्रक्चर) सातत्याने सुधारणा होत आहे. ग्राहक कार्डाचा वापर करून पैसे देऊ शकतील अशा टचपॉइंट्सच्या संख्येत वाढ होत आहे. डिजिटल पेमेंट्सना चालना देण्यासाठी संपूर्ण परिसंस्थेत सुधारणा करण्याचे प्रयत्न सरकार करत आहे आणि आता या सुविधांचा कार्यक्षम वापर करून राष्ट्राच्या रोख रकमेविरोधातील लढ्यात योगदान देणे ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. पैसे देण्यासाठी रोख रक्कम हा अखेरचा पर्याय असला पाहिजे,”

टीआर रामचंद्रन पुढे म्हणाले,अनेक लोकांना असे वाटते की, डेबिट कार्ड म्हणजे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक रकमेनुसार एटीएममधून रोख पैसे काढता येतात ते कार्ड. हा या कार्डाचा एकमेव उपयोग नाही. डेबिट कार्ड खरे तर ग्राहकांसाठी खरेदी सोपी करते.

आज तुम्ही तुमचे डेबिट कार्ड वापरून जवळपास प्रत्येक गोष्टीसाठी पैसे देऊ शकता- किराणामाल, सिनेमाची तिकिटे, प्रवासाची तिकिटे, होम डिलिव्हरी, खाद्यपदार्थ, सदस्यत्व शुल्क, इलेक्ट्रॉनिक्स- तुम्हाला दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या बहुतेक सगळ्या गोष्टी या डेबिट कार्डद्वारे मिळवता येतात.

LEAVE A REPLY

*