Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

मुंबई : उत्पादन शुल्क विभागाकडून विदेशी मद्याचा साठा जप्त

Share

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबईत एका मोठ्या कारवाईत अवैधरित्या विदेशी मद्य बाळगणाऱ्या इसमाला ताब्यात घेतलं आहे. एकूण सहा हजार तीनशे मी.ली विदेशी मद्यासह सहा लाख २६ हजार ९६२ रुपये किमतीचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.

अधिक माहिती अशी कि, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक आर एम भापकर, पी व्ही पाटील, मनेश दराडे व संजीव केंद्रे यांनी विलेपार्ले पूर्व येथे सापळा रचत अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या अजयकुमार यादव यास ताब्यात घेतले.

या दरम्यान अजयकुमार सोबत एक लिटरच्या ३० विदेशी तर राहत्याघरी एक लिटरच्या ३३ विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. यानंतर एसीबीने कारवाई करत त्यास अटक केली.

दरम्यान अजयकुमार यास बांद्रा येथील न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यास न्यायालयाने तीन दिवसांची एक्साईज कोठडी सुनावण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!