Type to search

हिट-चाट

जिद्दी कनिकाची ‘यशोगाथा’, ‘झी युवा सन्मान’ सोहळ्यात सन्मानित!!!

Share

मुंबई  : तरुणांच्या दैदिप्यमान कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, गेली तीन वर्षे ‘झी युवा सन्मान’ हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या युवा पिढीतील आदर्श व्यक्तींचा सन्मान या सोहळयात केला जातो. यंदाही हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

‘कनिका कौस्तुभ राणे’ या, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात मागील वर्षी शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे, यांच्या पत्नी आहेत. पतीच्या निधनामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ३ वर्षांच्या लहानग्याची व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. परंतु, या परिस्थितीतने खचून न जाता, त्यांनीही भारतीय लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला.

अवघ्या काही कालावधीतच, लष्कराच्या परीक्षा पास होऊन त्यांनी आपण प्रशिक्षणासाठी तयार असल्याचं दाखवून दिलं. मोठ्या दिमाखात भारतीय लष्कराचा एक भाग होऊन, त्यांनी कठीण परिस्थितीतून बाहेर पडत, केवळ कुटुंबाचीच नाही, तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेची जबाबदारी या रणरागिणीने आपल्या खांद्यावर घेतली. अशा या जिद्दी स्त्रीला, ‘युवा जिद्दीची यशोगाथा’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!