झी नाट्य गौरवमध्ये साजरी होणार पु.ल. देशपांडेंची जन्मशताब्दी

0

मुंबई : रंगभूमी आणि कलेचा वारसा असलेल्या नाट्य क्षेत्रातील कार्यरत असलेल्या रंगकर्मींना सन्मानित करणारे, त्यांच्या कामाला दाद देणारे आणि त्याचं कौतुक करणारे प्रतिष्ठित आणि मोलाचं व्यासपीठ म्हणजे झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा.

यंदाचं झी गौरव पुरस्कारांचं हे २० वे वर्ष होते. यावर्षी हा सोहळा काही दिग्गज कलाकार आणि रंगकर्मी यांच्या उपस्थितीत अगदी दिमाखदारपणे पार पडला. बहारदार परफॉर्मन्सेस आणि मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या पुरस्कार सोहळ्यात रंगकर्मींनी अनेक पुरस्कार पटकावले. यंदा झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक ‘काजव्यांचा गाव’ याला १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं.

प्रतिभावान पुलंनी असंख्य मराठी मनांचा एक कप्पा कायमसाठी व्यापून टाकला आहे आणि अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला झी नाट्य गौरव पुरस्कारात आदरांजली देण्यात आली. अभिनेता अतुल परचुरे, अद्वैत दादरकर, आशुतोष गोखले आणि आनंद इंगळे यांनी पु.ल. देशपांडे लिखित वाऱ्यावरची वरात या नाटकातील एक प्रवेश प्रेक्षकांसाठी सादर केला.

LEAVE A REPLY

*