Type to search

Breaking News टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

लवकरच सुरु होणार व्हाट्सअँप पेमेंट सर्व्हिस

Share

मुंबई : भारतातील सर्वात लोकप्रिय अँप म्हणून ओळख असणाऱ्या ‘व्हॉट्सअँप’द्वारे आता पेमेंटही करता येणार आहे.कारण नुकतेच व्हाट्सअँपने याबाबत आरबीआयशी चर्चा केली आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून व्हाट्सअँपद्वारे पेमेंट होणार अशी चर्चा देशभरात होती. आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. व्हॉट्सअँप भारतात लवकरच डिजीटल पेमेंटची सेवा सुरू करणार असून आरबीआयला याबाबत विचारणा करण्यात आली आहे. त्यानुसार व्हाट्सअँप आपली माहिती भारतात स्टोर करण्यास तयार झाला आहे.

युपीआयवर (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) आधारित डिजीटल पेमेंट सेवा आयसीआयसीआयय बँकेपासून सुरु करण्याची तयारी व्हॉट्सअँपने सुरू केली आहे. लवकरच ही सेवा एचडीएफसी, एसबीआय व अक्सिक्स बँकेला देखील लागू होणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!