येत्या फेब्रुवारीपासून तुमचं व्हॉट्सअँप बंद होणार; जाणून घ्या कारण

येत्या फेब्रुवारीपासून तुमचं व्हॉट्सअँप बंद होणार; जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : जगभरातील लाखो व्हॉट्स अँप वापरणाऱ्यांसाठी वाईट बातमी असून येत्या नवीन वर्षात व्हॉट्सअँप बंद होणार आहे. फेसबुकने आपल्या अधिकृत ब्लॉगपेस्टवर ही माहिती दिली असून ०१ फेब्रुवारी २०२० पासून व्हॉट्सअँप अनेक मोबाईलवर बंद होणार आहे.

दरम्यान याबाबत कंपनीने सांगितले कि, ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे. या निर्णयानंतर अँड्रॉइड, आयओएस, आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वर काम करणारे स्मार्टफोन युसर्स व्हॉट्सअँप वापरू शकणार नाही.

व्हॉट्सअँप यापुढे आयओएस ८ आणि त्यापूर्वीच्या आयफोनवर बंद होणार आहे. याचा अर्थ असा की ज्यांचे आयफोन ६ आणि त्यानंतरचे आयफोन आहेत त्यांना चिंता करण्याची गरज नाही. आयफोन वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअँपने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, “व्हॉट्सअँपच्या चांगल्या अनुभवासाठी ग्राहकांनी आपल्या आयफोनमध्ये उपडेट करून घ्यावा.’

जर तुम्ही अँड्रॉइड २.३.३ वापरात असाल तर आपल्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअँप चालणार नाही. याचबरोबर जर एखादा ग्राहक अँड्रॉइड व्हर्जन वर चालणाऱ्या मोबाईलमधून व्हॉट्सअँपचे खाते उघडत असेल तर ते खाते ब्लॉक करण्यात येईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com