Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

महाराष्ट्रात मान्सून आणखी एक आठवडा लांबणीवर

Share

मुंबई : उन्हाच्या काहिलीने राज्यात प्रत्येकजण होरपळलेला आहे. तसेच बळीराजादेखील पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र राज्यात दुष्काळ असताना आता मान्सून उशिराने आगमन करणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. साधारणपणे महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होतो.

यंदा देखील ०६ जून रोजी मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र आता मान्सून लांबवणीवर पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. ८ जून पर्यंत मान्सून पूर्वीच्या पाऊस येणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मान्सूनचे आगमन अंदमान भागात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल हळू राहणार आहे. यामुळे केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी आहे.

३१ मे पर्यंत तापमानात बदल अपेक्षित नसल्यामुळे उन्हाचा चटका कायम राहील, परंतु ०१ जूनपासून पूर्व-विदर्भ वगळता इतर भागातील कमाल तापमान कमी होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे राज्यात किमान ८ जूनपर्यंत तरी मान्सून-पूर्वीच्या पावसाची शक्यता नाही. यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असला तरी शेतकऱ्यांनी काळजी करू नये.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!