Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

#हॅप्पीबर्थडेकॅप्टन : विराटचा वाढदिवस आणि व्हायरल पत्र

Share

मुंबई : सध्या विश्व क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपला ३१ वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्याने भारतीय संघाला क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवून देण्यात नेहमीच मोलाची कामगिरी केली आहे.

आपल्या दमदार फॉर्मने भारतीय संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या कोहली केवळ भारतातच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्येही सर्वात चांगला फलंदाज बनला आहे. कोहली त्याचा वाढदिवस पत्नी अनुष्का शर्मा सोबत भूतानमध्ये साजरा करीत आहे. देशभातून विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा सकाळपासून मिळत आहेत.

विराट फॅन्सनी शुभेच्छांच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. तसेच वाढदिवसानिमित्त भारतीय संघातील खेळाडूंनी व माजी क्रिकेटपटूंनी अभियानंदन करत बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या. युवराज सिंह,रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर यांनी विशेष शुभेच्छा देत कोहलीचे मन जिंकले आहे.

दरम्यान विराटने या वाढदिवसाच्या दिवशी एका पत्रामधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विराट कोहलीचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतं आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!