Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या हिट-चाट

Video : ‘सोन्यानी सायकल’ सोशल मीडियावर व्हायरल; एकदा सर्च करून बघाच

Share

मुंबई : आजपर्यत नेटवर हिंदी किंवा मराठी गाणं व्हायरल झाल्याचे ऐकलं असेल परंतु आता एका अहिराणी गाण्याने धुमाकूळ घातला आहे. ‘सायकल सायकल व मारी सोन्यानी सायकल व ‘ असं शीर्षक असणाऱ्या या अहिराणी गाण्याला नेटकऱ्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.

दरम्यान टिकटॉकवर हे गाणे ट्रेंडिंगवर असून या गाण्याने नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे. सध्या हे गाणे प्रचंड व्हायरल होत असून, प्रेक्षकांकडून त्यास तुफान प्रसिद्धी मिळत आहे. खानदेशातील आदिवासी पावरा समाजातील हे गाणं आणि नृत्य प्रकार इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

तसेच अनेकांकडून या गाण्याला यू-ट्यूबवर रिलीज करण्यात असून लाखांहून अधिक विव्हज मिळाले आहेत. तुम्हीही एकदा या गाण्याला ऐकाल तर नक्कीच तुम्हीही या गाण्यावर थिरकायला लागाल अशाच प्रकारचे हे गाणं आहे.

‘सायकलं सायकलं मारी सोनानी सायकलं’ हे गं कोणी गायलंय किंवा लिहलंय अजूनही गुलदस्त्यात असून यातील बोल आणि संगीत प्रकारावरून ते आदिवासी किंवा ‘पावरी’ या भाषेतील गाणं असल्याचं सांगण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!