Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

२०२२ पर्यंत सर्वांना शुद्ध पाणी देणार; भाजपचे संकल्पपत्र जाहीर

Share

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ भाजपच्या जाहीरनामा प्रकाशन सोहळा पार पडला असून जाहीरनाम्याला ‘संकल्प पत्र’ असे नाव दिले आहे. या संकल्पपत्रात शेती, वीजनिर्मिती, रोजगार यांसह विविध योजनांचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात या संकल्प पत्राचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपा कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

दरम्यान सकंल्प पात्रात भाजपने विविध गोष्टीचा उहापोह केला आहे. यामध्ये पुढील मुद्दे मांडण्यात आले.

 • येत्या पाच वर्षांत १ कोटी रोजगार निर्माण करणार
 • शाश्वत शेतीसाठी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार
 • संपूर्ण महाराष्ट्र इंटरनेटने जोडणार
 • २०२२ पर्यंत सर्वांना शुद्ध पाणी देणार
 • कचऱ्यापासून वीज निर्मिती
 • शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा पुरवणार
 • पाचवीपासून पाठ्यपुस्तकात शेतीवर आधारीत अभ्यासक्रम लागू करणार
 • महाराष्ट्रातील विविध शहरांत पाच आयटी पार्क उभारणार
 • कोकणातलं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणणार
 • पाच वर्षात आयआयटी, आयआयएम आणि एम्स सारख्या नव्या संस्था उभारणार
 • दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे भाजपचं लक्ष्य, संकल्पपत्रात रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांवर भर
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!