Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

नारायण राणे यांचा रविवारी भाजप प्रवेश; पक्षही विलीन होणार

Share

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. दरम्यान नारायण राणे रविवारी (दि. ०१) भाजप मध्ये प्रवेश करणार आहे. तसेच राणे यांचा पक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्षदेखील भाजपामध्ये विलीन होणार आहे.

राज्यातील विधासभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून राजकीय पक्षांतर्गत हालचाली सुरु झाल्या आहेत. यामध्ये युतीत पक्षप्रवेश करणारांची संख्या अधिक दिसून येत आहे. मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचे आंदोलनाला नारायण राणे यांनी दिलेल्या भेटीत पत्रकारांशी बोलताना हि माहिती दिली. येत्या 1 सप्टेंबरला मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

दरम्यान भाजपने अनेक बड्या नेत्यांना आपल्या पक्षात सामाविष्ट करण्यावर भर दिला असून इकडे शिवसेनाही इतर नेत्यांनी हाताशी धरत आहे. आगामी विधानसभेच्या निमित्ताने युतीत मेगाभरती सुरु आहे. त्यातच नाराय राणे यांनी भाजपमध्ये उडी घेतल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!