Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

भाजपचा नवा ‘फॉर्मुला’; शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि इतर १३ मंत्रीपदे देण्याची ऑफर

Share

मुंबई : भाजप सेना सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटेना अशी गट झाली असून आता भाजपने शिवसेनेला अनोखी ऑफर दिली आहे. ती म्हणजे आता फिफ्टी फिफ्टी नाही तर १३-२६ असं गणित भाजपकडून शिवसेनेला सांगण्यात आले आहे.

यामध्ये शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि १३ मंत्रीपदे देण्याचा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे. तर मुख्यमंत्रीपद आणि इतर २६ मंत्रिपदं ही भाजपकडेच राहतील, अशीही माहिती मिळते आहे. त्यामुळे आता भाजपच्या या अनोख्या ‘ऑफर’नंतर शिवसेना काय फॉर्मुला सांगणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर सत्ता स्थापनेवरून शिवसेना भाजपमध्ये संघर्ष सुरु असून यामध्ये भाजपने आज नवाफॉर्मुला सांगितल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेला या निवडणुकीत ५६ जागा मिळाल्या असून शिवसेना मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा अशी मागणी केली होती. तसेच शिवसेनेने सांगितल्याप्रमाणे फिफ्टी-फिफ्टी हा ठरला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेवरून संघर्ष सुरु आहे.आता शिवसेना काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज भाजपच्या बैठकीत विधीमंडळ पक्षनेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!