Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

महाराष्ट्र विधानसभेवर ‘महिलाराज’; ‘या’ २४ आमदार गाजवणार विधानसभा

Share

नाशिक : कालच्या निकालाच्या जल्लोषात पुरुषांच्या संख्येबरोबर महिलाच सहभागही अधिक दिसून आला. हाच सहभाग विधानसभेतही दिसणार असून यंदा सर्वाधिक आमदार म्हणून महिलांचा समावेश झाला आहे.

राजकारण म्हटले की पुरूषांची मक्तेदारी असे बोलले जाते. पण महिला घरकामात जशा माहीर असतात. त्याचप्रमाणे राजकारणही महिला तितक्याच ताकदीने करू शकतात याच उत्तम उदाहरण हे राज्यातील विविध पक्षांच्या नवनिर्वाचित २४ महिला आमदारांनी दाखवून दिले आहे.

दरम्यान राज्यातील नव्या विधानसभेच्या सर्व २८८ जागांचे निकाल लागले असून यात महिलांचा टक्का गत निवडणुकीपेक्षा नक्कीच वाढला आहे. यावेळी २४ महिला आमदार विधानसभा गाजवणार आहेत. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात एकूण ३ हजार २३७ उमेदवार उतरले होते. त्यात २३५ महिला उमेदवारांना विविध राजकीय पक्षांनी संधी दिली होती. मावळत्या विधानसभेत २२ महिला आमदार होत्या. त्यात यावेळी एका आमदाराची भर पडताना दिसत आहे.

यंदाच्या निवडणुकीत ज्या विद्यमान आमदार पुन्हा विजयी झाल्या आहेत त्यात मंदा म्हात्रे (बेलापूर) मनीषा चौधरी (दहिसर) विद्या ठाकूर (गोरेगाव), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), माधुरी मिसाळ (पर्वती) मोनिका राजळे (शेवगाव), भारती लव्हेकर (वर्सोवा) यांचा समावेश आहे. या आठही भाजपच्या आमदार आहेत. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) यशोमती ठाकूर (तिवसा) आणि वर्षा गायकवाड (धारावी-मानखुर्द) यांनी पुन्हा एकदा आपापल्या मतदारसंघातून दिमाखात विजय मिळवला आहे.

प्रथमच विधानसभेत निवडून जाणाऱ्या महिला आमदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे (देवळाली), शिवसेनेच्या लता सोनावणे (चोपडा) आणि यामिनी जाधव (भायखळा), भाजपच्या मुक्ता टिळक (कसबा पेठ), श्वेता महाले (चिखली), मेघना बोर्डीकर (जिंतूर), नमिता मुंदडा (केज), काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (वरोरा) व सुलभा खोडके (अमरावती) यांचा समावेश आहे. गीता जैन (मिरा भाईंदर) आणि मंजुळा गावित (साक्री) या दोन अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजयी झाल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!