Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंच्या नावावर ‘हा’ विक्रम

Share

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नावावर आगळावेगळा विक्रम नोंदवला गेला आहे. ते राजीनामा स्वीकार अध्यक्ष झाले आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराचे वारे राज्यभर वाहू लागले आहेत. अशातच अनेक आमदार, खासदारांनी राजीनामे देत इतर पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान राज्यातील २६ आमदारांनी आतापर्यंत राजीनामा दिला असून ते राजीनामे अध्यक्षांनी स्विकारले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक राजीनामे स्वीकारण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या असतांना अनेक दिग्गज नेते , आमदार , खासदार, पदाधिकारी पक्षांतर करीत आहेत. यामध्ये राज्यातील आमदार , खासदारांचाही समावेश आहे. त्यामुळे येणारी निवडणूक औत्युक्याची ठरणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!