Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर होणारा खर्च माहितीय का?

Share

मुंबई : विधानसभेचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असून राजकीय वर्तुळात जोरदार तयारी चालू आहे. दरम्यान या निवडणुकीत राजकीय पक्षबदलामुळे रंगत वाढत आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यातून ३२३९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. निवडणुकांमधील चर्चेचा मूद्दा म्हणजे निवडणुकांवरील खर्च . तुम्हालाही पडला असेल कि निवडणुकांमध्ये किती खर्च होत असेल तर निवडणुकांवर साधारण बाराशे कोटी रुपये खर्च होतात.

निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून निवडणूक खर्च सुरु होतो. आता निवडणुका म्हणलं कि खर्च आलाच. परंतु निवडणूक आयोग काही ठराविक खर्च करण्यास सांगत असतात. त्यापॆक्षा अधिक पटीने खर्च हा निवडणुकीदरम्यान होत असतो. यंदाच्या विधानसभेसाठी प्रत्येक उमेदवाराला अधिकृतपणे २८ लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे.

निवडणूक आयोग यासाठी खर्चाची मर्यादा घालून देत असतो परंतु उमेदवार हवा तेवढा खर्च करत असतात. अशा काळात अनेक ठिकाणाहून निवडणूक पथक गस्त घालत असते. यातून बऱ्याचवेळा कोट्यवधी रुपये पकडले जातात. कारण उमेदवारांना आपल्या खर्चाचा तपशील विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यावा लागतो तर राजकीय पक्षांना त्यांचा खर्च केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे सादर करावा लागतो. त्यामुळेच राजकीय पक्षांच्या प्रचार सभा, रॅली, जेवण, प्रवासखर्च यासाठीचे खर्च पक्ष करत असतात.

निवडणूक प्रचाराचा बिगुल वाजल्यानंतर आता प्रचाराची परिभाषा बदललेली दिसते. आता हायटेक प्रचार होताना दिसून येतो. यामध्ये अधिकधिक व्हीआयपी हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. साधारण याचा खर्च दोन कोटींच्या आसपास येतो तर विमानाचा खर्च अडीच कोटीच्या घरात जातो. एकूण पक्षांचा विचार केला तर नुसता प्रवास खर्च ५० कोटींच्या घरात जातो.

तसेच प्रचारासाठी वापरल्या जाणारी वाहने, त्यांचा खर्च, येणारी माणसे, त्यांचे जेवण यासर्वांचा विचार केला तरी एका सभेचा खर्च हा कोटीच्या घरात जातो. एकूणच प्रचाराच्या दिवसांचं गणित केलं तर पंधरा दिवसाचा एका उमेदवाराचा खर्च ४० लाखाच्या आसपास पकडला तर एकूण निवडणुकीवर खर्च बाराशे कोटी रुपये होऊ शकतो. तर निवडणूक आयोगाने सांगितलेला २८ लाख रुपये खरंच होत असेल तर तो ९०० कोटींच्या घरात जातो. यावरून लक्षात येते कि, उमेदवार यापेक्षाही अधिक खर्च केल्याचे दिसून येते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!