Type to search

Breaking News maharashtra नाशिक मुख्य बातम्या

अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाची गरज नाही : उद्धव ठाकरे

Share

मुंबई : मला शिवसेनाप्रमुखांनी जे शिकवलं आहे की शब्द देण्यापूर्वी एकदा नाही, १० वेळा नाही, लाख वेळा विचार कर, त्याहीपेक्षा जास्त वेळा करायचा असेल तर जरूर कर. पण एकदा शब्द दिला म्हणजे दिला, परत मागे घ्यायचा नाही, गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा भाजपाचा डाव होता असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. “मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं आहे की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेला दाखवीन आणि ते मी पाळणार म्हणजे पाळणारच. त्याच्यासाठी मला अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा त्यांच्या आशीर्वादाची गरज नाही., असे ते म्हणाले मुंबईतल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान दुपारी तीन वाजता मुखयमंत्री फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी शिवसेनेवर टीका केली. यानंतर आता शिवसेना भावना येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. यावेळी ते म्हणाले कि, “लोकसभा निवडणुकीवेळी युतीची चर्चा सुरू असताना माझ्यासमोर प्रस्ताव आला की उपमुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळेल, मी म्हटलं उपमुख्यमंत्रीपदासाठी युती करण्याएवढा मी काही लाचार नाही, “दुर्दैवाने मला हा शब्द वापरावा लागतोय की देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांचा संदर्भ घेऊन माझ्यावर खोटेपणाचा आरोप केलाय.

मी देवेंद्रजींना सांगू इच्छितो, अमित शहा आणि कंपनीने कितीही आमच्यावर खोटेपणाचा आरोप केला तरी जनता पुरेपूर ओळखून आहे की खोटे कोण बोलतो आणि सत्य कोण बोलतो, पुढे ते म्हणाले कि, मला एका गोष्टीचं दुःख झालं की शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय, शिवसेनाप्रमुखांचा परिवार, या परिवारावर म्हणजे माझ्यावर पहिल्याप्रथम कोणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला आहे.”

“मला शिवसेनाप्रमुखांनी जे शिकवलं आहे की शब्द देण्यापूर्वी एकदा नाही, १० वेळा नाही, लाख वेळा विचार कर, त्याहीपेक्षा जास्त वेळा करायचा असेल तर जरूर कर. पण एकदा शब्द दिला म्हणजे दिला, परत मागे घ्यायचा नाही, भाजपने गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, गंगा साफ करता करता यांची मन कलुषित झाली. सत्तेची लालुच वाढत गेली. आज वाईट वाटतंय चुकीच्या माणसासोबत आपण कारण नसताना गेलो होतो. मला खोटं ठरवणाऱ्या माणसाशी मी बोलणार नाही, मला खोटं ठरविण्याचा प्रयत्न काळजीवाहूंनी करू नये, मला असा खोटा रिश्ता ठेवायला आवडत नाही असे ते म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!