Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

उद्या उदयनराजेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश; दिल्लीत रंगणार सोहळा

Share

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दोन तासांपूर्वी एका खास ट्विटच्या माध्यमातून भाजपात प्रवेश घेत असल्याचे निश्चित केले आहे. उद्या (दि. १४) रोजी दिल्ली येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित हा प्रवेश सोहळा होणार आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून उदयनराजे हाती कमळ घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेर आज या चर्चेला पूर्णविराम विराम मिळाला असून उद्या उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने खराब संकेत असल्याचे दिसून येत आहे.

पुढील काही दिवसांत निवडणुका सुरु होणार असून या निवडणुकांच्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप तथा शिवसेनेत प्रवेश केला आहे. आजच भासकर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दरम्यान उदयनराजेंनी ट्विटद्वारे आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती दिली. उद्या दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्राध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!