Type to search

Breaking News गणेशोत्सव मुख्य बातम्या हिट-चाट

छोट्या पडद्यावरील सेलिब्रेटींच्या आठवणीतले गणराय

Share

मुंबई : राज्यात गणेशोत्सवाचे वेध लागले असून येत्या सोमवारी गणरायाचे आगमन घरोघरी होणार आहे. त्यामध्ये सामान्य माणूस असो किंवा सेलेब्रिटी सर्वांच्याच घरी गणराय विराजमान होतात. या दिवसात अनेक अनुभव तसेच आठवणी गणराय आपल्याला देऊन जातात. मालिकांमधील कलाकारांना तासनतास त्यांच्या कामानिमित्त शूटिंगमध्ये व्यस्त राहावं लागतं. त्यामुळे बऱ्याचदा या कलाकारांचे सण-उत्सव हे सेटवरच साजरे केले जातात. पण गणेशोत्सवाची मजाच काही निराळी असते. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरील काही कलाकारांनी आपल्या आठवणी शेअर केल्या आहेत.

माझ्या गावी १० दिवसांचा गणपती बसतो. त्यामुळे, लहानपणापासून असं एकही वर्ष गेलेलं नाही, ज्या वर्षी मी गणपतीत गावाला गेले नसेन. अर्थात, सुरुवातीला ११ दिवस गावी जात असे. नंतर कामामुळे हे दिवस कमी कमी होत गेले. पण दर वर्षी वेळ काढून मी गणेशोत्सवाला गावी जातेच. गणेश चतुर्थीच्या सुट्टीचा दिवस धरून, २ ते ३ दिवस मला मिळणार असल्यामुळे वेगवेगळ्या मंडळांच्या गणपतीला मी नक्की भेट देणार आहे. अशा विविध मंडळांच्या गणपतीला जाणं मला फार आवडत असल्याने माझं प्राधान्य त्यालाच असेल.                            तितिक्षा तावडे, झी युवा – तू अशी जावळी राहा

माझ्या घरी सुद्धा ५ दिवसांचा गणपती असतो. गणपतीची आरास करण्यासाठी साजणा च्या शूटिंगमधून वेळ काढणं कठीण जातं. तरीही रात्री घरी पोचल्यानंतर हे काम मी गेले १५ दिवस करतो आहे. रोज थोडं थोडं करत हे काम सुरू आहे. इकोफ्रेंडली आरास करण्याचा माझा प्रयत्न आहे. दरवर्षी एखादा छानसा देखावा तयार करण्याचा माझा प्रयत्न असतो. ही कला जोपासायला मला फार आवडतं. सार्वजनिक गणेशत्सवांना भेट देणंही मला फार आवडतं. १० दिवसांच्या काळात, वेळात वेळ काढून तेदेखील करण्याचा माझा प्रयत्न असतो.                   -अभिजित श्वेतचंद्र, झी युवा – साजणा

आमच्या घरी दीड दिवस गणपती बसतो. यानिमित्ताने सर्व नातेवाईक एकत्र येतात. फुलपाखरू च्या शूटिंग मधून वेळ काढून मी गणपतीच्या सजावटीसाठी मदत करते .एक वेगळाच माहोल यानिमित्ताने घरात निर्माण झालेला पाहायला मिळतो. संपूर्ण घरात आनंदाचे व उत्साहाचे वतावरं असल्याने वेळ फार मजेत जातो. गणेशोत्सवाचे माझ्यासाठी असलेले आणखी एक महत्त्व म्हणजे, माझा जन्म गणेशोत्सवाच्या काळात झालेला असल्याने, दरवर्षीचा वाढदिवस याच दरम्यान येतो.                                                                                                            -हृता दुर्गुळे, झी युवा – फुलपाखरू

माझ्या घरी सुद्धा ५ दिवसांचा गणपती असतो. त्यामुळे दरवर्षी तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं चित्रीकरण सांभाळून सर्व तयारी करावी लागते. अर्थातच, गणेशोत्सवासाठी सुट्टी घ्यायची म्हणजे त्याचा परिणाम मालिकेच्या चित्रिकरणावर होणार नाही, याची काळजी मी घेतो. मला जसं शक्य होईल तसं मी जास्त वेळ शूटिंग करून सर्व भाग वेळेत पूर्ण होतील याचा प्रयत्न करतो. त्यानुसार, काम वेळेत पूर्ण झाले आहे याची खात्री झाल्यानंतर, घरच्या गणपतीसाठी यंदा मी सुट्टी घेतली आहे. कामाचा व्याप कितीही असला, तरीही घरच्या बाप्पासाठी सुट्टी घ्यायला हवी. यासाठी जे करणे शक्य आहे, ते करण्याचा माझा प्रयत्न असतो.                                                                                                -हार्दिक जोशी, झी मराठी – तुझ्यात जीव रंगला 

माझ्या घरी दहा दिवसांसाठी बाप्पांची प्रतिष्ठापना होते. बाबांची कामानिमित्त सतत बदली होत राहायची. त्यामुळे नगर, बीड, परभणी अशा अनेक ठिकाणी आम्हाला जावं लागायचं. पण तरीसुद्धा दरवर्षी गणपती आणण्याची प्रथा कायम आहे.
आई-बाबा नाशिकच्या घरी राहतात. तिथेच आम्ही गणपतीचा सण साजरा करतो. मात्र, गौरी माझ्या काकांच्या घरी आणली जाते. मी आणि सुखदा न चुकता गणपतीसाठी नाशिकला जातो. माझ्या नावऱ्याची बायको या मालिकेच्या कामामुळे मी व्यस्त आहे. मात्र, तरी देखील मी चित्रिकारणातून वेळ काढून काही दिवसांसाठी मी नाशिकला जाऊन येईन.                                                                                        -अभिजित खांडकेकर, झी मराठी – माझ्या नवऱ्याची बायको

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!