Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

देवेंद्र फडणवीसांच्या नावावर तीन विक्रम; सर्वात अल्पकाळ मुख्यमंत्री

Share

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर त्यांच्या नावावर दोन ते तीन विक्रमांची नोंद झाली. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

याचबरोबर सगळ्यात अल्पकाळ टिकलेल्या सरकारचे मुख्यमंत्री राहण्याचादेखील विक्रम त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे. 1963 मध्ये मारोतराव कन्नमवार यांच्या निधनानंतर पी. के.सावंत यांच्याकडे आठ दिवसांसाठी मुख्यमंत्रिपद आले होते. यानंतर वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले होते.

मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हा आठ दिवसांचा विक्रमदेखील मोडीत काढला. अवघ्या तीन दिवसात त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. याशिवाय एकाच व्यक्तीने महिनाभराच्या आत दोनदा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचाही विक्रम आज फडणवीस यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!