Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

१७८ वर्षांच्या थॉमस कूक कंपनीचा दिवाळखोरीसाठी अर्ज

Share

मुंबई : जगातील सर्वात जुनी प्रवासी कंपनी म्हणून ओळखली जाणारी थॉमस कूक आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ब्रिटनमधील ही कंपनी पर्यटन क्षेत्रात बेस्ट ब्रँड म्हणून ओळखली गेलेली आहे. मात्र, ती कर्जाच्या ओझ्याखाली कोलमडली असून कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज सादर केला आहे.

सोमवारी कंपनीच्या व्यवस्थापनाची कर्जपुरवठादारांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती. तथापि, या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. कर्जपुरवठादारांनी कंपनीत आणखी पैसे गुंतवण्यास स्पष्ट नकार दिला. परिणामी कंपनीला दिवाळखोरी जाहीर करण्यावाचून पर्याय उरला नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

कर्जपुरवठय़ात वाढ करण्याचा प्रस्ताव तत्वतः मान्य करण्यात आला होता. तथापि, काही अतिरिक्त सुविधा कंपनीला हव्या होत्या. त्या पुरविण्यास कर्ज देणाऱयांनी नकार दिल्यामुळे चर्चा फिसकटली, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर फंखयुझर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कंपनीने चीनच्या फोसन टुरिझम कंपनीबरोबर बोलणी चालविली होती. फोसन टुरिझमने १. १ बिलियन डॉलर्स देण्यास तत्वतः मान्यता दिली होती.

या मोबदल्यात तिला कंपनीचे नियंत्रण आणि दैनंदिन व्यवहार करण्याचा अधिकार मिळणार होता. तसेच कंपनीच्या विमानसेवेत मायनॉरिटी स्टेक मिळणार होता. कर्ज आणि समभाग यांची अदलाबदल करण्याचाही व्यवहार जवळजवळ पक्का झाला होता. तथापि, ऐनवेळी नव्या अटी समोर आल्याने बोलणी पुढे जाऊ शकली नाहीत, असे सांगण्यात आले.

देदीप्यमान इतिहास
ब्रिटनच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या खालोखाल एकेकाळी थॉमस कूकचे जगभरात नाव होते. ती ब्रिटनची एफटीएसई १०० निर्देशांकातील ब्ल्यू चिप कंपनी म्हणून ओळखली जात होती. सूर्यप्रकाशासाठी आसुसलेल्या युरोपियन प्रवाशांना उष्ण प्रदेशांचे सुट्टीतील दौरे घडवून आणण्यासाठी ही कंपनी प्रसिद्ध होती. या संदर्भात तिची जर्मनीच्या टीयुआयएजी या कंपनीशी स्पर्धा होती. मात्र आता कंपनीने दिवाळे निघाले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!