Type to search

हिट-चाट

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेने गाठला ५०० भागांचा टप्पा

Share

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेनं अल्पावधीतचं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं उभा करण्यात यशस्वी झालंय. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. आता या मालिकेने तब्बल ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. मालिकेचे दिग्दर्शक कार्तिक केंढे यांनी फेसबुकवर संपूर्ण टीमचा फोटो शेअर केला आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा ५०० वा भाग शनिवारी प्रसारित झाला. संपूर्ण मालिकेच्या टीमचा फोटो शेअर करत दिग्दर्शकांनी रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. मालिकेत संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी डॉ. अमोल कोल्हेंनी शारीरिक, बौद्धिक व मानसिक या तिन्ही स्तरांवर विशेष मेहनत घेतली. मालिका सुरू होण्यापूर्वी त्यांनी या तयारीबद्दल सांगितलं होतं. शारीरिक स्तरावर मी भारदस्त छाती, धिप्पाड शरीर यासाठी बराच काळ मेहनत घेतली आणि अजूनही घेतोय.

बौद्धिक स्तरावर मेहनत घेताना मी ज्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांवर पुस्तकं लिहिली आहेत ती पुस्तकं तसेच ज्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांवर प्रबंध लिहिले आहेत तेही वाचले. प्रत्येकाचं महाराजांवरचं लिखाण, त्यांचा महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. तो दृष्टिकोन मी समजून घेतला.

आपली मालिका ही इतिहासाच्या एकेकाळच्या सुवर्णकाळाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. त्यामुळे इतिहासाला कुठेही गालबोट न लागता ही मालिका प्रेक्षकांसमोर सादर करणं आणि आजच्या तरुणाईला संभाजींची ओळख करून देणं याचं भान ठेवत ही मालिका केली असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!