सॅमसंगच्या गॅलेक्सी जे ६ च्या किंमतीत तिसऱ्यांदा कपात

0

मुंबई : सॅमसंग कंपनीने लाँच केलेल्या गॅलेक्सी जे ६ या स्मार्टफोनला बाजारपेठेत चांगला प्रतिसाद लाभला आहे. कंपनीने या फोनची किंमत कमी कारण्याचाच निर्णय घेतला आहे. यामुळे या मॉडेलचे तीन जीबी रॅमचे व्हेरियंट १०,४९० तर ४ जीबी रॅमचे व्हेरियंट ११,९९० रूपयात आता ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे ६ या मॉडेलमध्ये कंपनीचा ऑक्टा-कोअर एक्झीनॉस ७८७० हा गतीमान प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये फुल व्ह्यू या प्रकारातील, ५.६ इंच आकारमान, एचडी प्लस (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे गुणोत्तर १८:५:९ इतके आहे.

यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्स तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा एक्सपेरियन्स हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*