Type to search

Breaking News टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

सॅमसंगच्या ग्राहकांसाठी खुशखबर; Galaxy M40 चा ‘ओपन सेल’

Share

मुंबई : सध्या बाजारात वेगवेगळ्या मोबाईल ब्रॅण्डशी चलती असून स्मार्टफोन बाजारात ओपन सेलमध्ये येण्याआधी त्या त्या वेबसाईटवर लाँच होतात. दरम्यान भारतातील नावाजलेली कंपनी म्हणून ओळख असलेल्या सॅमसंगचा गॅलेक्सी एम४० हा स्मार्टफोन नुकताच ओपन सेलमध्ये उपलब्ध झाला आहे. यामुळे ऑनलाईन सेलला खरेदी करता न आलेल्या ग्राहकांसाठी हा मोबाईल ऑफलाईन खरेदी करता येणार आहे.

सॅमसंग Samsung Galaxy M४० च्या ६जीबी रॅम आणि १२८जीबी क्षमता असलेल्या स्मार्टफोनची किंमत १९,९९० रुपये आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कामापनीने खास ऑफर्स लागू केल्या आहेत.

त्यामध्ये हा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर व्होडाफोनच्या ग्राहकांना २५५ रुपयांच्या रिचार्जवर ३ हजार ७५० रुपये कॅशबॅक, तर जिओच्या ग्राहकांना १९८ आणि 299 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर अतिरिक्त इंटरनेटचा फायदा मिळणार आहे. तसेच एअरटेल वापरकर्त्यांना देखील विशेष ऑफर्स आहेत.

Galaxy M४०मध्ये ६. ३ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. तसेच हा फोन मिडनाइट ब्लू आणि सीवॉटर ब्लू अशा दोन कलर मध्ये उपलब्ध आहे.  फोटोग्राफीसाठी तीन प्रकारचे कॅमेरे देण्यात आलेले आहेत. यामध्ये एक ३२ मेगापिक्सल, दूसरा ८ मेगापिक्सल आणि तिसरा लेंस ५ मेगापिक्सल असणार आहे. तसेच सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कैमरा दिलेला आहे.

३५००mAh ची बॅटरी असून या स्मार्टफोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ आणि ४G सोबत सर्व फिचर देण्यात आलेले आहे. महत्वाचे म्हणजे या स्मार्टफोनला रियर फिंगरप्रिंट स्कैनर दिलेले आहे.

याशिवाय व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना १८ महिन्यांसाठी अतिरिक्त ०. ५ जीबी डाटा मिळेल. तर, एअरटेलच्या ग्राहकांसाठी १० महिन्यांपर्यंत १०० टक्के अतिरिक्त डाटा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!