Type to search

टेक्नोदूत मार्केट बझ

रिअलमीचे दोन नवे स्मार्टफोन लाँच

Share

मुंबई : रिअलमी ने भारतीय बाजारात आपले दोन नवे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. यापैकी एक स्मार्टफोन हा एंट्री लेवलचा भाग आहे तर दुसरा स्मार्टफोन प्रीमियम फिचर आणि लुक सह उपलब्ध आहे. त्यामध्ये रिअलमी ५ Pro आणि रिअलमी ५ असे मॉडेल लाँच केले आहेत. या दोन्ही फोनच्या मागच्या बाजूस चार कॅमेरे आहेत.

रिअलमी एक्स या फोनची डिझाइन, लेटेस्ट इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नोलॉजी, ट्रू फुल व्ह्यू देणारी टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर आणि ३७६५ mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये २० VoLTE ची व्हीओसीसी ३.० फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.

ज्यामध्ये ३ जीबी रॅम ३२ जीबी रोम, ६ जीबी ६४ जीबी, ८ जीबी १२८ जीबी देण्यात आले आहेत. या तिन्ही फोन्सची किंमत अनुक्रमे १३९९९, १६९९९ आणि १९९९९ रुपये अशी ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन दोन रंगात – पोलर व्हाईट आणि स्पेस ब्ल्यू मध्ये उपलब्ध आहे. हा फोन येत्या ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल

तसेच रिअलमी ५ ची किंमत ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज साठी ९९९९ असून ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज १०९९९ तर ४ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज : ११९९९ आहे. या फोनचा सेल येत्या २७ ऑगस्टपासून दुपारी १२ वाजल्यानंतर सुरू होईल. दोन्ही फोन फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!