Type to search

Breaking News टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

भारतीय बाजारपेठेत ‘मेक इन इंडिया’ आयफोनची निर्मिती लवकरच

Share

मुंबई : लवकरच देशातील युवकांचे आयफोनचे स्वप्न सत्यात उतरणार असून भारतीय बाजारपेठेत ‘मेक इन इंडिया’ ‘आयफोन’ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. भारतात स्थित असणाऱ्या ‘फॉक्सकॉन’चे युनिट या संदर्भात काम करणार आहे.

दरम्यान आपल्याकडे आयफोन असणे हे महत्वाचे मानले जाते. परंतु महाग होण्याच्या दृष्टीने आयफोन खरेदी करता येत नाही परंतु आता भारतीयांचे हे स्वप्न पूर्ण होणार असून पुढील महिन्यात भारतात आयफोन सादर होण्याची शक्यता आहे.

महत्वाचे म्हणजेच आयफोनचे देशातच उत्पादन होणार असल्याने त्याची किंमत इतर उपकरणांच्या तुलनेत कमी असण्याचीही शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आयफोन XR व आयफोन XS चे उत्पादन भारतात होणार असून येत्या ऑगस्टमध्ये यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान याबाबत apple कंपनीने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!