Type to search

Breaking News maharashtra टेक्नोदूत मुख्य बातम्या

तुम्ही जर व्हाट्सअँपचे अनसपोर्टेड व्हर्जन वापरत असाल तर सावधान ?

Share

मुंबई : व्यक्तीच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये तंत्रज्ञानाने महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यातच व्हाट्सअँप म्हणजे जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत व्हाट्सअँप आपल्या हाताशी असते. परंतु हेच व्हाट्सअँप पूर्णतः बंद झाले तर?

सध्या संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून व्हॉट्सअप कडे बघितले जाते. या मेसेजिंग अँपमध्ये जरासा बिघाड झाला तरी दुर्लक्ष करू नका, नाहीतर हेच व्हॉट्सअँप कायमचे बंद होऊ शकते. Temporarily banned असा मेसेज व्हॉट्सअँप वापरतेवेळी तुम्हाला दिसू लागल्यास सावध व्हा. कारण, या अँपच्या अधिकृत व्हर्जनऐवजी एखादे अनसपोर्टेड व्हर्जन तुम्ही वापरत असल्याचाच हा इशारा असल्यामुळे सपोर्टेड व्हर्जन वापरण्यास लगेचच सुरुवात करा, नाहीतर व्हॉट्सअँप कायमचे बंद होऊ शकते.

व्हॉट्सअँप प्लस आणि जीबी व्हॉट्सअँप हे अनसपोर्टेड व्हर्जन असून व्हॉट्सअँपची अनधिकृत प्रत आहेत. व्हॉट्सअँपच्या अधिकृत व्हर्जनचा वापर करण्यासाठी लगेचच चॅट हिस्टरीचा बॅकअप घ्या. तुम्हाला बॅकअप घ्यायचा आहे की नाही, हे तुमच्या मोबाईलमध्ये कोणत्या व्हॉट्सअँपचे व्हर्जन आहे, यावरुन ठरवले जाईल.

मोबाईलमधील अनधिकृत व्हर्जनचे नाव माहिती करुन घेण्यासाठी More Options > Settings > Help > App info पाहा. जर व्हॉट्सअँप प्लस किंवा जीबी व्हॉट्सअँप किंवा इतर कोणते अँप वापरत असाल, तर चॅट बॅकअप घेण्याला प्राधान्य द्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!