Type to search

Breaking News टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

अँपल कंपनीकडून ‘या’ चार मॉडेलची विक्री बंद

Share

मुंबई : सर्वात महागडा स्मार्टफोन ब्रँड अशी ओळख असणाऱ्या अँपल कंपनीने आपल्या चार खास स्मार्टफोनची विक्री बंद केली आहे. येत्या काही दिवसात iPhone SE, iPhone 6, iPhone 6Plus आणि iPhone 6sPlus हे चारही आयफोन भारतात बंद होणार आहे. हे चारही आयफोन अपलच्या सर्वात स्वस्त आणि सुरुवातीच्या किमतीतील आहेत. मात्र हे चारही स्मार्टफोन बंद होणार असल्याने भारतातील आयफोनच्या चाहत्यांना कमी किमतीतील आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न महाग होणार आहे.

आयफोनच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात iPhone SE, iPhone 6, iPhone 6Plus आणि iPhone 6sPlus या चारही आयफोन बनवणे बंद केलेत. त्यामुळे काही दिवसात भारतात हे चार आयफोन बंद होतील. त्या ऐवजी भारतात नवीन आयफोनचा iPhone ६s हा फोन येईल अशी माहिती आयफोन विक्री करणाऱ्या वितरकांना अपलच्या सेल्स टीमने दिली आहे. त्यामुळे आता या चार आयफोनऐवजी भारतात आता नवा iPhone 6s हा फोन येणार आहे.

iPhone 6s या फोनची किंमत २९ हजार ५०० रुपये आहे. पण यापूर्वी भारतातील iPhone SE ची सुरुवात किंमत २१००० किंवा २२००० रुपये होती. त्यामुळे आता आयफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला ८ हजार रुपये अधिक खर्च करावा लागणार आहे.

अपलने हे चारही आयफोन बंद करण्याचा निर्णय २०१८-१९ मध्ये घेतला होता. एप्रिल मे महिन्यात भारतात अँपलच्या सेलमुळे कंपनीला चांगला फायदा झाला होता. गेल्या एप्रिल मे महिन्यात कपंनीच्या नेट प्रॉफीटमध्ये ८९६ कोटींची वाढ झाली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!