Type to search

हिट-चाट

कंगना रनौत च्या ‘धाकड़’ चित्रपटाचा टीजर रिलीज

Share

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील कंगना म्हणून ओळख असणाऱ्या कंगना रनौतच्या ‘धाकड’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे.

दरम्यान या टीझरमध्ये पुन्हा एकदा कंगना नव्या अवतारात पाहावयास मिळत असून या चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याचे जाणवते. टीजरच्या सुरवातीलाच हातात गन घेतलेल्या कंगनाची दमदार एंट्री होते. तसेच एखाद्या चित्त्याप्रमाणे पावले टाकत, समोर असलेल्या डबक्यात काही असल्याचे तिला जाणवते आणि त्यावर ती गोळ्या झाडते. शेवटी ओठावर ओघळणारे रक्त आणि एक भेदक नजर यामुळे संपूर्ण पडदा आणि आपले काळीज व्यापले जाते.

एकूणच पैसे वसूल टिझर असून ‘धाकड’ चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले आहे, तर सोहेल मकलाई हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. २०२० च्या दिवाळीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!