Type to search

maharashtra

टाटा उभारणार ५५० खाटांचे सुसज्ज रुग्णालय

Share

मुंबई : परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये देशभरातून हजारो रुग्ण येत असल्याने गर्दी वाढताना दिसत आहे. कर्करुग्णांची ही वाढती संख्या लक्षात घेऊन परळच्या हाफकिन संस्थेमध्ये पाच एकर जागेवर ५५० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून २०२२ पर्यंत हे रुग्णालय प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. याशिवाय याच जागेत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भव्य धर्मशाळा व डॉक्टरांसाठी निवासी इमारतही बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६८० कोटी रुपये खर्च येणार आहे.

रुग्णालयांच्या या प्रकल्पासाठी एकूण ४५० कोटी रुपये खर्च येणार असून धर्मशाळा व डॉक्टरांच्या इमारतीसाठी २३० कोटी असे ६८० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही सर्व रक्कम अणु ऊर्जा विभागाने उपलब्ध करून दिली असून जागतिक निविदेच्या माध्यमातून रुग्णालयाच्या आरेखनाचे काम करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!