Type to search

Breaking News मुख्य बातम्या हिट-चाट

Video : मुघलांच्या साम्राज्यावर पहिला ‘सर्जिकल स्ट्राईक’; ‘तानाजी’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Share

नाशिक : रयतेच्या स्वराज्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली, अनेकजण धारातीर्थी पडले. यापैकीच एक म्हणजे तानाजी मालुसरे होय. या वीर योध्याचा इतिहास पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला.

या चित्रपटात अजय देवगण सह काजोल, सैफ अली खान प्रमुख भूमिकेत आहेत. कोंढणा किल्ला जिंकण्यासाठी प्राणांची बाजी लावणारे तानाजी मालुसरे पहिल्यांदाच चित्रपटाच्या ‘ Tanhaji: The Unsung Warrior ‘माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहेत.

आज या बहुप्रतिक्षित सिनेमाचा ट्रेलर रसिकांसमोर आला आहे. तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अजय देवगण तर उदयभानच्या भूमिकेत सैफ अली खान झळकणार आहे. या सिनेमात या दोघांची टक्कर पाहणं रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

तसेच अनेक दिवसांनी रिअल लाईफ जोडी असलेली अजय -काजोल या सिनेमातून दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून काजोल पहिल्यांदाच मराठमोळ्या आणि ऐतिहासिक भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. पुढील वर्षी १० जानेवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!