सुप्रीम कोर्टाचा हुंड्यासाठी छळ प्रकरणी महत्वपूर्ण निर्णय

0

नवी दिल्ली : ‘हुंड्यासाठी छळ केल्यास आता संबंधित आरोपींना तात्काळ अटक होणार आहे’. यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए.एम. खानविलकर आणि न्यायाधिश डी. व्हाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा निर्णय दिला आहे.

यापूर्वी 2017 साली हुंड्यासाठी छळ याप्रकरणी अारोपींना सरळ कोठडीत डांबू नका. प्रकरणाच्या तक्रांरीची शहानिशा करा आणि मगच आरोपींवर गुन्हा दाखल करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.

भारतीय दंड विधान 498A या कायद्याचा दुरूपयोग होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने आपल्या आधीच्या निर्णयात बदल करत ‘हुंड्यासाठी छळ प्रकरणातील पीडितेच्या सुरक्षितातेच्या कारणास्तव निर्णयात बदल करून आता हुंड्यासाठी छळ याप्रकरणी आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले आहेत’.

LEAVE A REPLY

*