राज्यातील २६ लाख शालेय विद्यार्थी राबविणार तंबाखू विरोधी मोहीम

0

मुंबई : “मी माझे कुटुंब, नातेवाईक आणि आपली शाळा नेहमी तंबाखूमुक्त ठेवीन, असा ठाम निर्धार करीत महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांमधील २५ हजार शाळांमधील विद्यार्थ्यांनी सामूहिक शपथ घेत राज्यात तंबाखू विरोधी मोहीम हाती घेतली आहे. तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची समाजात जनजागृती करण्यासाठी “प्लेज फॉर लाईफ” हे राष्ट्रीय अभियान राबविण्याचा दृढ संकल्प विद्यार्थ्यांनी केला. राज्यातील जवळपास २६ लाख विद्यार्थी या तंबाखू विरोधी मोहिमेचे संदेश दूत बनले आहेत. सर्व शाळांमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे.

शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आणि संबंध हेल्थ फाऊंडेशन तर्फे “प्लेज फॉर लाईफ” हे राष्ट्रीय अभियान राबविले जात आहे. त्यात विद्यार्थ्यांना तंबाखू विरोधी माहितीपट दाखवून जागृत केले जाते. सोबत तंबाखू विरोधी सामूहिक शपथ घेत आपली शाळा आणि समाज तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रेरित केले जाते.

याबाबत राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंखी सांगतात की, आम्ही आमच्या शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षित आणि तंबाखूमुक्त वातावरणात राहावेत यासाठी कटीबद्ध आहोत. अशा उपक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहभागाने तंबाखू सेवन विरोधी जनसंदेश अधिक बळकट केला जाईल असेही ते म्हणाले.

या अभियानाच्या माध्यमातून तंबाखूचा वापर आणि व्यसनामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम कमी करण्यासाठी शिक्षक आणि विध्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित त्यांची एक साखळी निर्माण केली जाणार आहे. या अभियानात लहान वयातील मुलांपासून जागृत केले जाणार असून विद्यार्थी तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहावेत यासाठी त्यांना माहिती दिली जाणार आहे. जेणे करून स्वच्छ, स्वस्थ आणि समर्थ भारत तयार करण्यासाठी राष्ट्र उभारणीच्या दिशेने त्यांनी मदत होईल.

LEAVE A REPLY

*