Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

PhotoGallery : मुंबईत मुसळधार; वाहतूक सेवा ठप्प

Share

मुंबई : मुंबई-पुण्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत वाहतूक खोळंबली आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरातील वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. तसेच पुण्यातील खडकवासला, मुळशी, पवना धरणातून हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

दरम्यान या पावसामुळे चाकरमान्यांचे वेळापत्रक कोलमडले असून मध्य, आणि हार्बर रेल्वे वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहे. तसेच तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईसह उपनगरात खड्यांमुळे रस्ते वाहतूकही धिम्या गतीने सुरू आहे. वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे.

तसेच मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागातही पावसाचा जोर कायम असून ठिकठिकणी तळी साचली आहेत. या यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

(फोटो साभार : सोशल मिडिया )

दरम्यान शहरातील बऱ्याच ठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमडली असून रेल्वे तसेच बसेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पुढील २४ तास मुसळधार पाऊस असल्याने मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईतील महापालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!