Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

‘आरे’त राज्यसरकारचा रात्रीस खेळ चाले; वृक्ष तोड सुरु

Share

मुंबई : प्रतिनिधी

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडची उभारणी करण्यासाठी आरे कॉलनीमधील वृृक्ष तोडीला विरोध करणा~या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळताच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) रात्री ९.३० वाजेच्या सुमारांस आरे काॅलनीत झाडे तोडण्यास सुरुवात केली.

यामुळे संतप्त पर्यावरणवाद्यांनी आरे काॅलनीकडे धाव घेवून निषेध करण्याचा प्रयत्न केला, परंतु उपस्थित पोलिसांनी त्याना मध्येच अडवून आरे पोलिस ठाण्यात नेले. अशाप्रकारे पर्यावरणवाद्यांना चिरडून रात्रीच्यावेळी झाड्यांची कत्तल करणे कितपत योग्य आहे? असा सवाल पर्यावरप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

मेट्रो कारशेडसाठी आरे काॅलनीतील सुमारे २७०० झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्याकरिता महापालिकेत वृृृक्ष प्राधिकर समितीमध्ये प्रस्ताव पास झाला होता. परंतु आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये राजकिय पक्ष, सामाजिक मंडळे, संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी आरे काॅलनीत दररोज आंदोलने, निदर्शने सुरुच ठेवली होती. यामुळे एमएमआरसीएल आणि राज्य सरकारला तर्तास वृृृक्ष तोड थांबवावी लागली होती. तसेच राज्य सरकारकडून सप्टेंबर महिन्यापर्यंत आरे काॅलनीतील एकाही झाडांना हात लावला जाणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च दाखल करण्यात आले होते.

शुक्रवारी रात्री क्रेनच्या सहाय्याने पाडण्यास आलेली झाले ही सुमारे १०० ते १५० वर्षांपुर्वीची होती. ती किती कापली हे अद्यापही कळू शकले नाही. झाडांची कत्तक करतावेळी वृृृक्ष प्राधिकरण समिती, पर्यावरणप्रेमी, राज्य सरकार आणि महापालिकेतील प्रशासकिय अधिकारी यांची उपस्थिती होती का? असे विविध प्रश्न आता उपस्थित होवू लागले आहे.

सप्टेंबर महिना संपताच आणि राज्यासह मुंबई विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागतानाच आरे काॅलनीतील वृृक्ष तोड सुरू झाली आहे. यामुळे मुंबईकरांमध्ये सरकारविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणा~या आरे काॅलनीतील सुमारे २७०० झाडांची कत्तल म्हणजे पर्यावरणाचा ~हास असल्याची प्रतिक्रिया आरेतील आदिवासींनी दिल्या.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!