Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

राज्य मंत्रीमंडळ विस्ताराला सुरवात; मंत्रीमंडळात कोणाला मिळाली संधी?

Share

मुंबई : राज्यात शिवसेना आणि भाजप युतीने लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार होत आहे. सकाळी अकरा वाजेपासून मंत्रिमंडळ विस्ताराला सुरवात झाली आहे. मुंबईतील राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची उपस्थिती आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार, जयदत्त क्षीरसागर त्याचप्रमाणे संजय कुटे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

तसेच मागील मंत्रीमंडळात असलेल्या प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, दिलीप सावरा, विष्णु कांबळे या विद्यमान मंत्र्य़ांना डच्चू मिळाला आहे. राज्य मंत्रीमंडळात आरपीआयच्या अविनाश महातेकर यांना संधी मिळाली असून अशा प्रकारे भाजपला १० तर शिवसेना २ व आरपीआयच्या महातेकराचा मंत्रीमंडळात समावेश आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!