Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

येत्या २७ ऑगस्टपासून प्रवाशांच्या सामानात भाडेवाढ; किमीनुसार आकारणार

Share

मुंबई : राज्य महामंडळाने २० किलोपेक्षा अधिक असणाऱ्या प्रवाशी सामानासाठी भाडेवाढ करण्यात आली आहे. दरम्यान हा आदेश राज्यातील प्रत्येक आगारात पाठवुइन्यात आला असून येत्या २७ आगस्टपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे.

दरम्यान राज्यभरातील प्रत्येक विभागातील एसटी बसमधून प्रवास करताना सामान भाड्यासाठी पाचपटीने तिकीट आकारणी करण्यात येणार आहे. २७ ऑगस्टपासून सामानाच्या तिकिटाचे किमान भाडे पाच रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत किमीनुसार आकारण्यात येणार असून २० किलोपेक्षा कमी वजनाचे सामान एसटीमधून मोफत घेऊन जाता येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

या निर्णयामध्ये वीस किलोपेक्षा अधिक वजनाचे सामान असल्यास पाचपट भाडे आकारले जाईल. तसेच वीसपासून पुढे देखील भाडेवाढ असणार असून ती आदेशाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. सामानाच्या भाडेवाढीचा निर्णय प्रवाशांच्या माहितीसाठी प्रत्येक आगारातील फलकावर लावण्याचे आदेश एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहे.

अशी होणार भाडेवाढ
शून्य ते ८४ किमीसाठी २० ते ४० किलोपर्यंतच्या सामानासाठी ५ रुपये आकारण्यात येतील. तर, शून्य ते ६०० किमीसाठी २० ते ४० किलोपर्यंतच्या सामानासाठी ५० रुपये आकारण्यात येणार आहेत. शून्य ते ७२ किमीसाठी ४० ते ५० किलोपर्यंतच्या सामानासाठी १० रुपये आकारण्यात येतील. तर, शून्य ते ६०० किमीसाठी ४० ते ५० किलोपर्यंतच्या सामानासाठी १०० रुपये आकारण्यात येणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!