Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

#HappyBirthdaySaurav : टीव्हीवर मॅच बघण्यात इतका दंग व्हायचो कि मैदानात जायचं हे विसरायचो….

Share

मुंबई : ‘टीव्हीवर मॅच पाहण्यात इतका रंगून जायचो कि मैदानात जायचंय हे लक्षातच यायचं नाही’ असे उद्गार आज ज्यांचा वाढदिवस आहे असे क्रिकेट जगात ‘दादा’ म्हणून ओळख असणाऱ्या सौरव गांगुली यांचे. ‘ए सेंच्युरी इज नॉट इनफ’ हे सौरव गांगुलीचे आत्मकथन असून ताईने या पुस्तकात आपल्या क्रिकेट विश्वातील आठवणी मांडल्या आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सर्वांचा ‘दादा’ म्हणून ओळख असलेला सौरव गांगुलीचा वाढदिवस सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच माजी क्रिकेटपटू तसेच भारतीय टीमकडूनही शुभेच्छा मिळत आहेत. या दरम्यान सौरव गांगुलीने लिहलेल्या ए सेंच्युरी इज नॉट इनफ’ या पुस्तकात अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

यामध्ये सौरवच नॅट्वेस्ट मधील विजयानंतर त्याचं लॉर्ड्स वर शर्ट काढून भिरकावणं, ग्रेग चॅपल बरोबरचा त्याचा वाद, सुरुवातीला बारावा गडी असतांना मैदानावर जाण्यास त्यानं उशीर लावणं, स्टीव्ह वॉला टॉस साठी वाट पहायला लावणं, केकेआर चा मालक शाहरूख खानशी त्याचं झालेलं तथाकथित भांडण या गोष्टी सौरवाने यात अंतर्भूत केल्या आहेत.

खऱ्या अर्थाने टीम इंडियाला लढायला आणि जिंकायला शिकवलेला कर्णधार म्हणून माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली ओळखला जातो. आज सोशल मीडियावर दादावर शुभेच्छांचा वर्षाव होतो.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!