Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

बीसीसीआयमध्ये आता ‘दादा’गिरी; गांगुलीने पदभार स्विकारला

Share

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील दादा म्हणून ओळख असणाऱ्या सौरभ गांगुलीने आज बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. बीसीसीआयच्या मुंबईतल्या मुख्यालयात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सौरभ गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्र हातात घेतली.

दरम्यान बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये सौरभ गांगुलीची बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी गांगुली विराजमान होणार हे निश्चित झालं होतं. त्यानुसार आज सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली.

दरम्यान, अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमाळ यांची बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी निवड झाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!