Type to search

हिट-चाट

#Teaser : हिरकणींनंतर सोनाली कुलकर्णीचा रहस्यमय ‘विक्की वेलींगकर’

Share

मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा नवा कोरा सिनेमा विक्की वेलिंगकरचा टिझर नुकताच लाँन्च करण्यात आला आहे. तरुण आदर्श यांनी सिनेमाचा टीझर आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला आहे. या टीझर मध्ये ‘लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस’ असं म्हणत सोनाली पूर्णतः बिनधास्त अंदाजात दिसून येत आहे.

हिरकणीच्या अफाट यशानंतर लागलीच सोनाली कुलकर्णीचा नव्या चित्रपटाच्या टीझरने उत्सुकता वाढवली आहे. या टीझरमध्ये “ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?,”असा प्रश्न समोर ठेवण्यात आल्याने या सिनेमात काहीतरी रहस्यमय कथानक पाहायला मिळणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत. अवघ्या ५० सेकेंदाच्या या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!