Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या राजकीय

महाराष्ट्रात कुणाचे सरकार येणार? भाजप कि शिवसेना

Share

नाशिक : २४ ऑक्टोबर ला विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून महाराष्ट्रात कुणाचे सरकार येणार? याच उत्तर अजून कुणालाही सापडलेलं दिसत नाही. तसेच या प्रश्नांकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादी -काँग्रेस या हे पक्ष एकत्र येत सरकार स्थापन करणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.

दरम्यान विधानसभा निवडणूक निकाल लागून १८ दिवस होत आले असतांना अद्यापही सरकार स्थापन न झाल्याने राजकीय गोंधळ वाढ चालला आहे. परिणामी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले कि, कोणी सरकार स्थापन करण्यास तयार नसेल तर शिवसेना त्याचा पदभार स्वीकारू शकेल.

हे लक्षात घेता शिवसेनेने पक्षाची बैठकही बोलविली आहे. त्यात आदित्य ठाकरेही सहभागी होतील. दरम्यान, कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही राज्यपालांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सरकार स्थापण्यासाठी निमंत्रित करण्याचे आवाहन केले आहे. रविवारी एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘भाजप-शिवसेनेने सरकार स्थापन करण्यास नकार दिला आहे, म्हणून महाराष्ट्रातील राज्यपालांनी राज्यातील दुसर्‍या क्रमांकाच्या आघाडी राष्ट्रवादी-कॉंग्रेसला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करावे.’ त्यामुळे सरकार स्थापनेचा तिढा सुटणार कधी याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!