Type to search

हिट-चाट

‘चैत्या’ आता जॉर्ज रेड्डी या तेलगू सिनेमात झळकणार

Share

मुंबई : नाळ चित्रपटातील चैत्या उर्फ श्रीनिवास पोकळे आता एका तेलगु चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी चित्रपट सृष्टीत एका वेगळ्या धाटणीच्या ‘नाळ’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणारा ‘चैत्या’ तेलगु चित्रपट ‘जॉर्ज रेड्डी’ या चित्रपटात दिसणार आहे.

दरम्यान ‘नाळ’ चित्रपटातून चैत्या म्हणजेचं श्रीनिवास पोकळे याने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होत. या चित्रपटातुन चैत्याने मराठीत पदार्पण केल्यानंतर आता श्रीनिवास जॉर्ज रेडी या चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या बालपणाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटासाठी श्रीनिवासने तेलगु भाषेचे धडे गिरविले आहेत. श्रीनिवासने या चित्रपटाचे पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये श्रीनिवास डोक्यावर पुस्तक घेऊन स्मितहास्य करताना दिसत आहे. त्यामुळे श्रीनिवासला या दाक्षिणात्य चित्रपटात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!