श्रद्धा कपूर सायना नेहवालच्या बायोपिकमधून आउट

0

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या अनेक दिवसांपासुन चर्चेत आहे. कारण सायना नेहवाल यांच्या जीवनावरील बायोपिकमध्ये ती मुख्य भूमिकेत असणार आहे. परंतु काही अडचणीमुळे या बायोपिकमध्ये आता श्रद्धाऐवजी दुसरा चेहरा झळकणार आहे.

श्रद्धा कपूर गेल्या दोन वर्षांपासून भारताची फुलराणी अर्थात सायना नेहवालच्या बायोपिकवर काम करत आहे. चित्रीकरणादरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने अखेर हा चित्रपट अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोडला आहे. त्यामुळे आता सायनाची भूमिका कोण करणार याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

श्रद्धाने बॅडमिंटनच्या काही महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर शूटिंगला सुरुवात केली होती. पण तिला शूटिंग सुरू होताच काही दिवसांनी डेंग्यू झाला. तिने त्यानंतर तिच्या दुसऱ्या चित्रपटांसाठी काही वेळ दिला. पुन्हा सायनाच्या बायोपिकचे शूटिंग एप्रिलमध्ये सुरू होणार होते. सध्या श्रद्धा ‘छिछोरे’ आणि ‘स्ट्रीट डान्सर’ या दोन चित्रपटांमध्ये व्यस्त असून त्याचबरोबर लवकरच प्रभाससोबतचा ‘साहो’ चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

*