Type to search

Breaking News maharashtra राजकीय

सध्याच्या स्थितीला भाजपच जबाबदार : उध्दव ठाकरें

Share

मुंबई  :  

आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या मातोश्री येथील बैठकीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना दिलेले वचन आपण पूर्ण करणार आहोत असेही आमदारां समोर सांगितले.

ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरु आहे, त्याला आज अंतिम स्वरुप मिळणार आहे. थोड्याच वेळात निर्णय येणार असून शिवसेना आमदारांनी मुंबईतच थांबावे असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. बैठकीत सगळ्या आमदारांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे असा आग्रह केला.

उद्धव ठाकरें आमदारांना थांबा असे म्हणाले, बाळासाहेबांना वचन दिले आहे ते आपण पूर्ण करणार आहोत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार चर्चा सकारात्मक सुरु आहे. आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ती भाजपमुळे झालेली आहे. भाजप जर अशी वागली नसती तर असे झाले नसते.

आजची परिस्थिती उद्भवण्यामागे भाजपच जबाबदार आहे. गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरु आहे त्याला आज अंतिम स्वरुप मिळेल आणि थोड्याच वेळात सत्तास्थापनेचा निर्णय येईल. महाराष्ट्रात सत्ताकारणामुळे आमदारांमध्ये जो राजकीय संभ्रम निर्माण झाला होता तो दूर करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मातोश्रीवर घेण्यात आलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांशी थेट संवाद साधला. शिवसेनेची बैठक संपल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांसोबतच्या मुंबईत होणा-या महत्त्वाची बैठकीसाठी ठाकरे रवाना झाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!