Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

असा आहे शिवसेनेचा दहा आश्वासनांचा वचननामा

Share

मुंबई : प्रतिनिधी

आरे कॉलनीतील झाडांचे संरक्षण, दहा रूपयांत पोटभर जेवणाची थाळी, एक रूपयांत आरोग्य सेवा, शेतकर्‍यांच्या खात्यात थेट १० हजार रुपये आणि १५ लाख पदवीधारांना शिष्यवृत्ती यासह दहा प्रमुख आश्वासने असलेला शिवसेनेचा यासह १० प्रमुख आश्‍वासनांचा समावेश असलेला वचननामा शिवसेनेने प्रसिद्ध केला.

मुंबईत मातोश्रीवर आज शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर या वचननाम्याचे प्रकाशन झाले. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध करताना आदित्य ठाकरे, अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती होती.

यापूर्वीच काँग्रेस राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे तर महायुतीतील भाजपचा जाहीरनामा १५ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे या जाहीरनाम्यांपेक्षा वेगळा आणि मतदारांना आकर्षित करणारा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील दहा वचनं

१. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते निर्माण करणार.
२. ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार.
३. आर्थिक दुर्बल घटकातील मुलींचं शिक्षण मोफत करणार.
४. राज्यातील १५ लाख पदवीधर युवकांना ‘युवा सरकार फेलो’मार्फत शिष्यवृत्ती
५. रोजगाराभिमूख शिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करणार.
६. अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्षाला १० हजार जमा करणार.
७. तालुका स्तरावर गाव ते शाळा प्रवासासाठी विद्यार्थी एक्स्प्रेसची सुरूवात करणार.
८. प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिक व शारीरिक तपासणी करणार.
९. नगरपरिषदा, नगरपालिके, महानगरपालिकेत रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद.
१०. ज्या ठिकाणी बससेवा नाही त्या ठिकाणी मुंबईप्रमाणे बससेवेची सुरूवात करणार.
११. सर्व राज्यांमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल उभारणार.
१२. ‘शिव आरोग्य योजने’अंतर्गत वन रूपी क्लिनिक सुरू करणार.
१३. राज्यात १ हजार ठिकाणी स्वस्त आणि सकस जेवण केंद्र स्थापणार.
१४. सरकारी नोकरीतील सर्व रिक्त पदं भरणार

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!