Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी निवडणूक लढवणार : आदित्य ठाकरे

Share

मुंबई : तळागाळातील समाजापर्यंत विकास पोहोचवायचा आहे, यासाठी हीच ती वेळ असून केवळ तुमच्यासाठी मी विधानसभेची निवडणूक लढवणार आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ते वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान वरळी येथे युवा संकल्प मेळाव्या दरम्यान ते बोलत होते. आदित्य ठाकरे हे आपली पहिली निवडणूक वरळी विधानसभा मतदारसंघातून लढवणार आहेत.

मला नवा महाराष्ट्र घडवायचा असून येथील जनतेची ओळख निर्माण करावयाची आहे त्यामुळेच मी निवडणुकीला उभा राहत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंसाठी संजय राऊत पवारांकडे ?

शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात अचानक झालेल्या भेटीमागे मोठे कारण असल्याचे समोर येत आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास सज्ज असलेले शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासाठी राऊत यांनी पवारांची भेट घेतली होती. आदित्य यांना बिनविरोध निवडून द्या, अशी विनंती राऊत यांनी या भेटीत केल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

वरळीतूनही उमेदवार देणार- अजित पवार

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची घोषणा येत्या गांधी जयंती दिनी म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असून वरळी विधानसभा मतदारसंघातूनही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. त्यामुळे वरळीत आदित्य ठाकरे यांना आघाडीच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!