Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

आजपासून सॅनिटरी पॅड केवळ १ रुपयात; जन औषधी केंद्रांमध्ये उपलब्ध

Share

मुंबई : महिलांना तसेच मुलींना लागणारे सॅनिटरी पॅड आजपासून म्हणजेच २७ ऑगस्टपासून केवळ १ रुपयात उपलब्ध होणार आहे. सरकारी जनऔषधी केंद्रांमध्ये हे सॅनिटरी पॅड उपलब्ध होतील अशी माहिती रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली.

दरम्यान गेल्या वर्षभरात वर्षात सुमारे २.२ कोटी नॅपकिनची विक्री करण्यात आली. आता किंमत आणखी कमी केल्याने ही विक्री दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. सरकारी जनऔषधी केंद्रांमध्ये हे पॅड्स आधी अडीच रुपयांना प्रत्येकी एक अशा किंमतीत मिळत होते.

ते आता केवळ ०१ रुपयांत मिळणार आहे. त्यामुळे आधी ०४ रुपयांना मिळणारे पॅडचे पाकिट आता केवळ ०४ रुपयांना मिळणार आहे. देशभरातील ५५०० जन औषधी केंद्रांमध्ये ‘सुविधा’ या नावाने हे सॅनिटरी पॅड्स उपलब्ध असतील, असे मांडवीय म्हणाले.

महिलांना दर महिन्याला येणा-या मासिक पाळीमध्ये पूर्वीच्या काळी महिला कपडा वापरायच्या. हे त्यांच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी घातक होते. म्हणून सॅनिटरी पॅड्स ही नवीन संकल्पना राबविण्यात आली.

मात्र याची किंमत ही गोरगरीबांना परवडण्यासाठी नसल्यामुळे अनेक महिला किंवा मुली आजही कपडा वापरतात. त्यामुळे सामाजिकतेचे भान ठेवून महिलांसाठी काय फायद्याचे आहेत हे लक्षात घेऊन हा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!